सिंधुदुर्ग today
देवगड निपाणी महामार्गावर नांदगाव ते तोंडवली रस्त्याचे काम सुरू.
आज पदाधिकारी यांनी काम योग्य होत नसल्याचा आरोप करीत रोखले.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील तोंडवली ते नांदगाव तिठा या देवगड निपाणी राज्य महामार्गाचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे यामध्ये डांबरीकरण तसेच मोरीचे बांधकाम असे कोट्यवधी रुपयांचे काम सुरू आहे. याबाबत आज कासार्डे जिल्हा परिषद चे माजी सदस्य संजय देसाई, नांदगाव सरपंच भाई मोरजकर ,उपसरपंच इरफान साटविलकर ,रज्जाक बटवाले , यासिर मास्के आदी पदाधिकारी ग्रामस्थांनी सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप करीत काम थांबविण्याचे संबंधितांना सांगण्यात आले. योग्य प्रमाणात डांबर नाही तसेच साईट पट्टी योग्य प्रकारे घातली जात नसल्याचे सांगत बांधकाम खात्याच्ये अधिकारी जेई हे कोणी लक्ष देत नाही कामांची काॅलेटि पाहणे साइड पट्टी डांबर मिक्स खडि आदि सर्व बाबी लक्षात घेऊन हे अधिकारी ऑफिस मध्येच राहुन कामाचा दर्जा कसा तपासणार यामुळे स्त्याचे काम ठेकेदार कसेही काम करून घेत असल्याचे सर्वांनी सांगत काम थांबवण्याची जोरदार मागणी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा