सिंधुदुर्ग today



नांदगाव दशक्रोशी श्री राम भक्तांच्या वतीने २२ जानेवारी रोजी भव्य मिरवणूक 

संपूर्ण नियोजन बैठक गाव वाईज सुरू 

कणकवली प्रतिनिधी 

   अयोध्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी  मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.गेल्या 500 वर्षानंतर हा दिवस आला आहे.त्यानिमित्ताने नांदगाव दशक्रोशी श्री राम भक्त यांच्या वतीने भरगच्च  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबत योग्य नियोजन करण्यासाठी गाव वाईज बैठक सद्या सुरू आहेत .

 कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी 7 ते 9 प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्या मंदिरात पूजा करणे   दिवा बत्ती करणे, सकाळी 9.30 वाजता नांदगाव तिठा येथून मिरवणूकीने नांदगाव मोरये वाडी येथील श्रीराम मंदिर येथे प्रयाण व मंदिर येथे आरती करणे, सकाळी ठीक 10.15 वा. नांदगाव मोरये वाडी ते गोसावी वाडी कुंभार वाडी श्रीराम मंदिर येथे प्रयाण व आरती करणे , सकाळी 11 .30 मिरवणूक नांदगाव तिठा येथील ब्रिज खाली स्क्रीन वर  LED TV मार्फत सर्वांना  अयोध्या येथील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवणार आहे. दुपारी 1 नंतर तोंडवली येथील श्री हनुमान मंदिर येथे सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच सायंकाळी 6.30 ते 7.30 आपल्या जवळील मंदिरात तसेच प्रत्येक घरातील अंगणात दिव्यांची आरस करून उत्सव साजरा करणे. अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी नांदगाव, असलदे, कोळोशी, आयनल,तोंडवली - बावशी ,ओटव , बेळणे,सावडाव ,माईण आदी दशक्रोशितील सर्व श्री रामभक्त यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री राम भक्त यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today