सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे आज दहीकाला जत्रोत्सव .
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील दहीकाला जत्रोत्सव आज दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी साजरा होत आहे.
प्रति वर्षाप्रमाणे वार्षिक दहीकाला जत्रोत्सव तिथी मार्गशीर कृष्ण प्रतिपदा आज गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी दहा वाजता पूजा विधी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत स्थानिक भजने रात्री दहा ते बारा श्रीराम पालखी सोहळा रात्री ठीक बारा वाजता श्री बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ कवटी यांचा दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून जत्रोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक श्री राम सेवा ट्रस्ट नांदगाव गोसावी कुंभारवाडी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा